आपण देखील वारंवार हिचकी येण्याचा त्रासाने वैतागला आहात तर हे घरगुती उपायांना अवलंबवून या त्रासाला दूर करू शकतो. कोणी पाणी द्या ह्याला ! असे आपण बऱ्याच वेळा ऐकले असेलच की हा हिचकीने त्रासलेला आहे. बऱ्याच वेळा काही खाल्ल्यावर किंवा काही प्यायल्यावर हिचकी येऊ लागते, ज्यामुळे त्रास सहन करावा लागतो. बऱ्याच वेळा मित्रां समोर देखील हिचकी येऊ लागते. तर खूप वाईट वाटते. तसे हिचकी न येण्याचे उपाय कमीच आहे. पण हिचकी आल्यावर त्याच्या त्रासाला सहजपणे दूर केले जाऊ शकते. हे काही सोपे उपाय आहेत ज्यांना अवलंबवून आपण हिचकी चुटकीशीर दूर करू शकतो.
* लिंबू पाणी -
लिंबू पाणी देखील हिचकीच्या समस्या दूर करण्यासाठी एक प्रभावी आणि घरगुती उपाय आहे. या साठी आपण कोमट पाण्यात लिंबाच्या रसाला मिसळून त्याचे सेवन करावं. ह्याचे सेवन तेव्हाच करावं ज्यावेळी हिचकी अधिक प्रमाणात येत आहे. बऱ्याच वेळा घशात काही अडकल्यामुळे देखील हिचकी येते. बऱ्याच वेळा हे घशाला नुकसान देते. आपण साधारण पाण्यात देखील लिंबाच्या रसाला मिसळून सेवन करू शकता.