कृती-
सर्वात आधी मक्याचे पोहे एका कढईत तळून घ्या आणि थंड होऊ द्या. आता कढईत तेल गरम करून शेंगदाणे, काजू आणि मनुके तळून घ्या. बाजूला काढून ठेवा. त्याच तेलात मोहरी, कढीपत्ता, हळद आणि लाल तिखट घालून फोडणी करा. मक्याचे पोहे आणि तळलेले शेंगदाणे, काजू, मनुके घालून मिक्स करा. आता मीठ आणि पिठी साखर घालून दोन मिनिटे परता. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा. तसेच मक्याचे पोहे आधीच कुरकुरीत असतात, त्यामुळे जास्त तळण्याची गरज नाही.