भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या ऑडी कारने सोमवारी पहाटे नागपूरच्या रामदासपेठ परिसरात अनेक वाहनांना धडक दिली, त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. या प्रकरणी चालकासह अन्य एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आलिशान कारमधून प्रवास करणारे लोक धरमपेठ परिसरातील एका बिअर बारमधून परतत असताना हा अपघात झाला.
या वर युबीटीचे नेते संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, या प्रकरणातील सर्व पुरावे पुसण्यात आले असून जो पर्यंत भाजपचे नेते फडणवीस गृह्मंत्रीपदावर आहे. राज्यात कोणत्याही प्रकरणात निष्पक्ष तपास होणार नाही. असं म्हणत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत नागपुरात दोघांना धडक देऊन गंभीर जखमी केले. या अपघातानंतर वाहनची नंबर प्लेट काढण्यात आली असा दावा संजय राऊतांनी केला आहे.ते म्हणाले, जोपर्यंत देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत आणि रश्मी शुक्ला पोलिस महासंचालक आहेत, तोपर्यंत राज्यात कोणत्याही प्रकरणाचा निष्पक्ष तपास होऊ शकत नाही.
या अपघातानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑडी कारची नोंदणी मुलगा संकेत याच्या नावावर केल्याचे मान्य केले. भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, पोलिसांनी कोणताही पक्षपात न करता या अपघाताचा सखोल आणि निष्पक्ष तपास केला पाहिजे. दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. मी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याशी बोललो नाही. कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे.