मुंबई: विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तर सुप्रिया सुळे यांनी NCP शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत संयुक्त बैठक घेतली. या बैठकीमध्ये सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना आदेश दिले. शरद पवार यांच्या पक्षामध्ये म्हणजे NCP च्या मनात नेमकं सुरु काय आहे? या घेऊन सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदेंशी वैर नाही, देवेंद्र तुमची खैर नाही. असा नवीन नारा देण्यात आला आहे, असे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सुप्रिया सुळेंनी सरकारची निंदा करत कार्यकर्त्यांना आदेश दिले आहे की, त्यांनी फक्त देवेंद्र फडणवीस यांची निंदा करावी. आमचे लक्ष्य देवेंद्र फडणवीस हेच असतील, असे त्यांनी बैठकीत सांगितले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करू नये. तसेच बैठकीत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मनोज जरांगे पाटील यांच्यावर कोणीही टीका करणार नाही, आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत.
तसेच सुप्रिया सुळेंनी आदेश दिले की, कोणीही अजित पवार बद्दल सहानुभूती दाखवणार नाही. सुप्रिया सुळेंच्या या भूमिकेमुळेच शरद पवार-एकनाथ शिंदे यांच्या नव्या युतीची तयारी सुरू झाली नाही ना? अशा चर्चांना आता वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करू नका, असे आदेश सुप्रिया सुळे देत असतानाच, काल शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचा चेहरा जाहीर करण्याची उद्धव ठाकरेंची मागणी फेटाळून लावली.