मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीवर नतमस्तक

सोमवार, 4 जुलै 2022 (21:54 IST)
अधिवेशनात तुफान फटकेबाजी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा चौकात जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केलं. त्यानंतर चैत्यभूमीवर जाऊन त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यानंतर भर पावसात मुख्यमंत्री शिवाजी पार्कातील स्मृतिस्थळाकडे रवाना झाले. बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीवर ते नतमस्तक झाले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव 164 विरुद्ध 99 मतांनी पारित झाला आहे. शिवसेना-भाजप युतीचं सरकार आजच्या विश्वासदर्शक ठरावात बहुमताने पास झालं आहे. म्हणून आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी आलो आहोत. हे सरकार बाळासाहेबांच्या आशिर्वादाने आलेलं आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार या राज्याला पुढे नेणार आहेत. आणि म्हणून आज बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार, शिवसेना-भाजप युतीचं सरकार आज स्थापन झालं आहे अशी भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती