विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड

सोमवार, 4 जुलै 2022 (19:31 IST)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात भाजप-शिंदे गटाचे सरकार स्थापन झालं.
 
आज विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. 
 
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधासभेत भाषण झालं. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर अजित पवार यांच्या नावाला विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृतरित्या मान्यता देण्यात आली. 
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज, सोमवारी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती