ठाण्यात डिलिव्हरी बॉय कडून 4 कोटी रुपयांचे मेफेड्रोन ड्रग्ज जप्त

बुधवार, 30 जुलै 2025 (10:46 IST)
वाढत्या ड्रग्ज तस्करीवर कडक कारवाई करताना, ठाणे पोलिसांनी दोन मोठ्या कारवाईत दोन तस्करांना अटक केली आहे आणि सुमारे4 कोटी रुपयांचे एमडी (मेफेड्रोन) जप्त केले आहे.
ALSO READ: मुंबईतील गोरेगावमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी पुन्हा मराठीवरून फायनान्स कंपनीच्या कार्यालयात गोंधळ घातला
धक्कादायक बाब म्हणजे या आरोपींपैकी एक झोमॅटोमध्ये फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता, तर दुसरा आरोपी मध्य प्रदेशातून त्याच्या कारमध्ये ड्रग्ज घेऊन आला होता. ठाणे पोलिस आयुक्तांच्या सूचनेनुसार चालवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेचे नेतृत्व अमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हे शाखा युनिट-1 ने केले होते. पहिली कारवाई 27 जुलै रोजी शिळफाटा परिसरात करण्यात आली होती
ALSO READ: मुंबईत २ कोटी रुपयांच्या ट्रामाडोल ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक
एक व्यक्ती ड्रग्स विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यांनी सापळा रचून आरोपी इरफान अमानुल्ला शेखला अटक केले. व्यवसायाने तो झोमॅटो डिलिव्हरी बॉय होता. त्याच्या बॅगेतून 1 किलो 522 ग्रॅम एमडी ड्रग्स होते. त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 2.77 कोटी रुपये आहे.
 ALSO READ: मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये चोरी
आरोपीच्या विरोधात शील डायघर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. 
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती