ठाणे जिल्ह्यातील अस्नोली येथील तळेपाडा गावात एका धक्कादायक घटनेत, तीन बहिणींचा अन्नातून विषबाधेमुळे मृत्यू झाला. काव्या(10),दिव्या (8), आणि गार्गी भेरे(8) असे या मयत मुलींची नावे आहेत. सोमवारी तिघांना पोटदुखी आणि उलट्या होऊ लागल्या, त्यां नंतर प्रथम अस्नोली येथील एका खाजगी डॉक्टरकडे आणि नंतर शाहपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने, काव्या आणि दिव्या यांना मुंबईतील नायर रुग्णालयात हलवण्यात आले, तर गार्गीला नाशिकजवळील एसएमबीटी रुग्णालयात हलवण्यात आले. तथापि, तिघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. काव्याचा गुरुवारी (24 जुलै) रात्री, दिव्याचा शुक्रवारी (25 जुलै) सकाळी आणि गार्गीचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला.
शाहपूरजवळील चेरपोली येथील रहिवासी संदीप भेरे हे गेल्या आठ महिन्यांपासून आपल्या पत्नी आणि तीन मुलींसह तालुक्यातील अस्नोली येथील आपल्या माहेरी राहत होते. सोमवार, 21 जुलै रोजी काव्या, दिव्या आणि गार्गी यांना पोटदुखी आणि उलट्या होऊ लागल्या, त्यामुळे त्यांच्या आईने त्यांना अस्नोली येथील एका खाजगी डॉक्टरकडे आणि नंतर शाहपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.उपचाराधीन असता त्यांचा मृत्यू झाला.