गोरेगावात पत्नीची गळा आवळून हत्या केल्यावर आरोपी पती फरार, शोध सुरु

सोमवार, 17 मार्च 2025 (18:21 IST)
गोरेगावात तिवारी चाळ येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी पती हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. 
ALSO READ: मुंबई: ७५ वर्षीय वृद्धाने बॅड टच केला, १६ वर्षीय मुलीने प्रियकरासह मिळून केली हत्या
आरोपी आणि त्याची पत्नी दोन महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालहून मुंबईत राहण्यासाठी आले.त्यांना मूलबाळ नव्हते.  मयताचा पती हा बांगड्या बनवणाऱ्या कारखान्यात काम करायचा 
ALSO READ: मुंबई विमानतळावर ३.६७ कोटी रुपयांचे सोने जप्त, चार तस्करांना अटक
प्राथमिक तपासात महिलेची हत्या गळा आवळून केल्याचे समोर आले आहे. महिलेच्या नाकावर देखील जखमा होत्या. हत्येननंतर आरोपी पती फरार झाला असून पोलिसांनी आरोपी पतीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. 
Edited By - Priya Dixit
ALSO READ: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन जूनमध्ये होईल, गौतम अदानी यांनी जाहीर केले

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती