औरंगजेबाची कबर मराठा शौर्याचे प्रतीक आहे, शौर्याचे प्रतीक पाडू नये संजय राऊतांचे विधान

सोमवार, 17 मार्च 2025 (17:29 IST)
सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलाच वाद होत आहे. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून काढून टाकण्याची मागणी केली जात आहे. बजरंगदल आणि विश्वहिंदू परिषदने कबर काढून टाकण्याची मागणी करत पुण्यात निदर्शने केली. औरंगजेबाच्या कबरी भोवती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. 
ALSO READ: औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण चालणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कडक इशारा
या विवादावरून शिवसेना यूबीटीचे नेते संजय राऊतांनी विधान केले आहे. ते म्हणाले औरंगजेबाची कबर मराठा शौर्याचे प्रतीक  आहे आणि शौर्याचे प्रतिकाला कधीही पडू नये. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि मराठयांनी औरंगजेबाविरुद्ध मोठे युद्ध लढले. आणि ही कबर इतिहासाची आठवण करून देणारी आहे. जर कोणी इतिहास समजून घेण्यास तयार नसेल तर तो स्वतः इतिहासाचा मोठा शत्रू आहे.  
ALSO READ: हर्षवर्धन सपकाळांचे मुख्यमंत्री फडणवीसांबाबत वादग्रस्त विधान, महायुतीने केली कारवाईची मागणी
राऊत यांनी हिंदू संघटनांनी केलेल्या आंदोलनावर तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आंदोलनाची काहीच गरज नाही. हे फक्त राजकीय नाटक आहे. 

सोमवारी मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, "आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे. ते एक महान पुरूष असून त्यांचा आदर महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात केला जातो. त्यांनी कधीही देशद्रोही आणि अप्रामाणिक लोकांना सोडले नाही. ते कधीही कोणासमोर झुकले नाही. ते स्वराज्यासाठी मुघलांशी लढले. 
ALSO READ: दुसरे पाकिस्तान बनवू इच्छित संजय राऊत आणि राहुल गांधी, माजी काँग्रेस नेत्याचा मोठा आरोप
औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात आहे. आणि हे मराठांच्या शौर्याचे प्रतीक आहे म्हणून या प्रतिकाला नष्ट करू नये असे मला वाटते. येणाऱ्या पिढ्यांना हा इतिहास माहित असावा की छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठे मुघलांशी कसे लढले. आणि मुघल मराठयांवर वर्चस्व गाजवू शकले नाही. हा इतिहास असून तशाच ठेवावा.

सध्या काही नवीन लोक हिंदुत्ववादी बनून आंदोलन करत आहे. त्यांना इतिहासाबद्द्दल काहीच माहिती नाही. कोणाच्याही सांगण्यावरून ते आंदोलन करतात. महागाईवर बोला, बेरोजगारीवर बोला, शेतकऱ्यांचा आत्महत्येवर बोला. 
अशा आंदोलनाची काय गरज आहे. सध्या केंद्रात मोदींची सरकार आहे आणि महाराष्ट्रात आरएसएसची सरकार आहे. आंदोलन कशासाठी करता. कबर काढून टाका कोणी थांबवले आहे. आंदोलनाचे नाटक बंद करा लोकांना त्रास होत आहे. 
 
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती