गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मंजूर, सध्या वेगवेगळ्या अनेक प्रकरणांत अडकलेले आहेत.

शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (21:38 IST)
गुणरत्न सदावर्ते यांना सिल्व्हर ओक प्रकरणात  जामीन मिळाला आहे. मुंबईच्या (Mumbai)गिरगाव न्यायालयाने सदावर्ते यांच्यासह अन्य 115 जणांना जामीन मंजूर केला आहे. गुणरत्न सदावर्ते हे सध्या वेगवेगळ्या अनेक प्रकरणांत अडकलेले आहेत. त्यातील दोन ठिकाणी म्हणजेच मुंबई आणि अकोला येथील दोन प्रकरणातून सदावर्तेंंना जामीन मिळाला आहे. मुंबईतील गिरगाव कोर्ट आणि अकोल्यातील अकोल कोर्टानं दिलेल्या जामीनामुळे सदावर्तेंना दिलासा मिळाला आहे.
 
शरद पवार यांच्या मुंबई येथील घरावर आंदोलकांनी आक्रमक होऊन हल्ला केला होता. या प्रकरणात पोलिसांनी 115 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं. तसंच या हल्ल्याचा कट रचल्याच्या आरोपात गुणरत्न सदावर्ते यांनाही अटक केली होती. तसंच इतर वेगवेगळ्या प्रकरणातंही सदावर्ते यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. यातील सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणातून त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
 
मराठा आरक्षण प्रकरणात केलेलं वादग्रस्त वक्तव्य, एसटी कर्मचाऱ्यांची केलेली फसवणूक अशा वेगवेगळ्या प्रकरणांत गुणरत्न सदावर्ते यांच्यावर पुणे, सातारा, कोल्हापूर, अकोला, बीड अशा अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती