शिवसैनिकांना चकवा देत राणा दाम्पत्य मुंबईत दाखल, पोलिसांनी बजावली नोटीस

शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (15:47 IST)
राज्यातील राजकारण मागील काही दिवसांपासून हनुमान चालीसा पठणवरुन चांगलंच तापलं आहे. भाजपाचे आमदार रवी राणा आणि नवनीत राणा  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या मातोश्री या निवास स्थानासमोर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा दिला होता. परंतु त्यांना अमरावतीच्या बाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला होता. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा गनिमी काव्याने मुंबईत दाखल झाले आहे. आता उद्या (ता. २३) ते मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करणार आहेत.
 
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज (ता. २२) विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईला जाणार होते. परंतु या दाम्पत्याला रोखण्यासाठी शिवसेननं आक्रमक पवित्रा उचलला असूनही चानक राणा पती-पत्नी मुंबईत दाखल झाले आहेत. मातोश्रीबाहेर मुंबई पोलिसांकडून मोठा बंदोबस्त लावला आहे. राणा दांपत्यामुळे मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
 
दरम्यान, पोलिसांना राणा दाम्पत्यांना नोटीस बजावली आहे. कलम १४९ प्रमाणे ही नोटीस बजावली असून कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास राणा दाम्पत्य जबाबदार राहणार असल्याचे त्यात म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती