टॅक्सी चालकांना पाण्याची बॉटल देत केला त्यांच्या कार्याला सलाम

शुक्रवार, 27 मे 2022 (19:21 IST)
मुंबईची वाहतूक ही शहरातील महत्वपूर्ण वाहतूक व्यवस्था आहे. आणि टॅक्सी सेवा हि त्यातीलच एक महत्वाचा भाग आहे. रात्रंदिवस ते हि सेवा चालू ठेवतात तसेच, 'कोविड लाट असो किंवा उष्णतेची लाट' हे न पाहता ते फक्त आपल्यासाठी काम करतात. गंभीर रुग्णाला वेळेवर सुरक्षितपणे रुग्णालयात नेण्यात मदत करतात म्हणून एखाद्यासाठी ते देव-देवतांपेक्षा कमी नसतात. मुंबईतील हे अनसंग हिरो प्रत्येकाला त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्यास मदत करतात. 
 
त्यांच्या या दिवस-रात्र सेवे बद्दल त्यांचे आभार मानावेत तेवढेच कमी, म्हणून ह्या मुंबईच्या अनसंग हिरोजना, खर्या नायकांना त्यांच्या सेवेबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी छोट्याप्रमाणात का होईना प्रयत्न केले जाऊ शकतात. यावेळी ग्लोबल हॉस्पिटल, परळ , मुंबई यांनी या टॅक्सी चालकांना मदत करण्यासाठी थंड पाण्याच्या बाटल्या देऊन या कडक उन्हात थोडासा दिलासा देत कृतज्ञता आणि काळजी व्यक्त केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती