बस चालकाने मद्यपान केलेले असून वेगाने गाडी चालवण्याच्या नादात पालघरच्या आधीच वाघोबा घाटात सकाळी 6 वाजेच्या सुमारास बस दरीत कोसळली. वाहकाला सांगत होतो की चालकाचा हाती बस देऊ नका त्याने मद्यपान केलं आहे. तरीही बस वाहकाने आमचे ऐकून घेतले नाही. आणि हा अपघात झाला. असे बस मधील प्रवाशांचे म्हणणे आहे. रातराणी बस सेवे अंतर्गत चालवणाऱ्या या बसचालकाला नाशिक मध्ये बदलण्यात आले. या अपघातात 15 ते 20 प्रवाशी जखमी झाले आहे. त्यांना पालघरच्या रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.