नवी मुंबईतून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. येथे ऐरोलीमध्ये गोळीबार झाला असून एका पित्यानेच आपल्या दोन्ही मुलांवर गोळीबार केला आहे. निवृत्त पोलीस कर्मचारी भगवान पाटील यांनी हा गोळीबार केल्याचं वृत्त समोर आलं आहे. मुलगा विजय आणि सुजय यांच्यावर त्यांनी गोळीबार केला आहे. विजय याच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत तर दुसरा मुलगा सुजयला गोळी घासून गेली.