एम्सचे सेंटर फॉर कम्युनिटी मेडिसीनचे प्रोफेसर डॉ संजय राय म्हणाले की, मुलांना लसीची तपासणी करण्यास सुरुवात केली गेली आहे आणि चाचणी अहवाल आल्यानंतरच मुलांना लसीचा एक डोस दिला जाईल. भारताच्या औषध नियामकानं 12 मे रोजी दोन ते 18 वर्षे वयोगटातील तरुणवयीन मुलांवर चाचणी करण्यास मान्यता दिली होती.सध्या देशातील लसीकरण मोहिमेत प्रौढ लोकांना कोवॅक्सीनची लस दिली जात आहे.