प्रोत्साहनपर कॅशबॅक योजना जाहीर, फास्टॅगधारक वाहनांना ५ टक्के सवलत

शुक्रवार, 8 जानेवारी 2021 (09:09 IST)
स्टॅग प्रणालीचा वाहनधारकांनी अधिकाधिक वापर करावा यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या अखत्यारीतील यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) पथकर नाक्यांवर फास्टॅगधारक वाहनांना ५ टक्के सवलत (कॅशबॅक) ११ जानेवारी २०२१ पासून दिली जाणार आहे.
 
पथकर नाक्यावरुन जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस व वेगवान होण्यासाठी फास्टॅग प्रणाली विकसित करण्यात आली आहे. फास्टॅग वापरकर्त्या वाहनांची संख्या वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वाहनधारकांसाठी प्रोत्साहनपर कॅशबॅक योजना जाहीर केली आहे.
 
तर, “ मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग व वांद्रे-वरळी सागरी सेतूने प्रवास करणाऱ्या प्रत्येक फेरीला पथकराच्या ५ टक्के कॅशबॅक रक्कम वाहनधारकाच्या फास्टॅग बँक खात्यात महामंडळामार्फत थेट जमा होईल. फास्टॅगचा वापर वाढावा, या हेतूने महामंडळाने कार, जीप व एसयूव्ही वाहनधारकांकरता मर्यादित कालावधीसाठी सवलत योजना लागू केली आहे,” असे सह-व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी सांगितले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती