कोरोना व्हायरसमुळे मार्च महिन्यापासून राज्यातल्या सगळ्या शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. दरवर्षी जून महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होतं, पण यावर्षी नेहमीप्रमाणे शाळा सुरू करण्यात आल्या नाहीत. वेळेवर शाळा सुरू न करता आल्यामुळे वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
कमी केलेल्या अभ्यासक्रमाची यादी संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांनी त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावी, तसंच याबाबत शाळांना, विद्यार्थ्यांना आणि पालकांना माहिती होण्यासाठी आवश्यक ती प्रसिद्धी द्यावी, असं शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं आहे.