BSNL च्या युजर्ससाठी चांगली बातमी आहे. कारण, कंपनीने आपली ‘5 pe 6’ ही ऑफर 31 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. आधी ही ऑफर कंपनीने 31 जुलैपर्यंत वाढवली (BSNL new cashback offer) होती. त्यानंतर आता पुन्हा यात वाढ करण्यात आली आहे. बीएसएनएलच्या या ऑफरमध्ये (BSNLOffers) युजर्सना 5 मिनिटांच्या कॉलच्या बदल्यात 6 पैसे कॅशबॅक मिळतात. या ऑफरमुळे ग्राहकांना दर महिन्याला 50 रुपयांचा फायदा होऊ शकतो.
BSNL new cashback offer या ऑफरनुसार युजर्सना 5 मिनिटांच्या कॉलच्या बदल्यात 6 पैसे कॅशबॅक मिळतात. यामध्ये एका ग्राहकाला दर महिन्याला जास्तीतजास्त 50 रुपये कॅशबॅक मिळू शकतात. बीएसएनएलचे ग्राहक व्हॉइस कॉलद्वारे किंवा एसएमएस पाठवून 6 पैसे कॅशबॅक मिळवू शकतात. ही ऑफर बीएसएनएलच्या वायरलाइन, ब्रॉडबँड आणि फायबर-टू-द-होम (एफटीटीएच) सब्सक्राइबर्ससाठी आहे.