रक्षाबंधनाच्या ‘राखी’ला पौराणिक काळात काय म्हणायचे, जाणून घेऊ या हे 5 गुपितं....

सोमवार, 27 जुलै 2020 (15:30 IST)
भाऊ बहिणीचा सणाला बांधल्या जाणाऱ्या राखीचे नाव राखी कधी पडले आणि पौराणिक काळात राखीच्या आधी त्याला काय म्हणायचे. जाणून घेऊ या संदर्भातील काही 5 खास गोष्टी.
 
1 असे म्हणतात की रक्षाला पूर्वी 'रक्षासूत्र' असे म्हणायचे हे रक्षासूत्र बांधण्याची परंपरा वैदिक काळापासूनची आहे ज्यावेळी माणसाला यज्ञ, युद्ध, शिकार,नवीन संकल्प आणि धार्मिक विधीच्या दरम्यान मनगटावर एक प्रकाराचा दोरा ज्याला 'कलावा' किंवा माउली (मोली )म्हणतात बांधले जात होते.
 
2 हेच संरक्षण सूत्र नंतर नवरा बायको, आई-मूल आणि नंतर भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक बनले. रक्षा बंधनाच्या व्यतिरिक्त देखील अनेक धार्मिक विधी प्रसंगी आज देखील रक्षासूत्र बांधले जातात.
 
3 रक्षा सूत्राला साधारण बोलण्याच्या भाषेमध्ये राखी म्हणतात जे वेदाच्या संस्कृत शब्द 'रक्षिका'चे शब्द रूपांतरण आहे. मध्यकाळात याला राखी म्हटले जाऊ लागले.
 
4 भाऊ बहिणीच्या ह्या पावित्र्य सणाला प्राचीन काळात वेगळ्या स्वरूपात साजरा करण्यात येत होते. पूर्वी तर सुताचा दोरा असायचा, नंतर नाडा बांधू लागले नंतर नाड्यांसारख्या फुंदे बांधण्याची परंपरा सुरू झाली नंतर पक्क्या दोऱ्यांवर फोमपासून सुंदर फुले बनवून चिकटवू लागले याला राखी म्हणू लागले. सध्याच्या काळात राखीचे तर अनेक प्रकार आहेत. राख्या कच्च्या सुतापासून जसे की स्वस्त वस्तूंपासून ते रंगीत कलावे, रेशीम दोरे, किंवा सोनं वा चांदी सारख्या महागड्या वस्तूंच्या देखील असतात.
 
5 असे देखील म्हणतात की राखीचा सण श्रावणातील पौर्णिमेला साजरा करतात म्हणून राक्ष म्हणण्याच्या पूर्वी याला श्रावणी किंवा सलूनो असे म्हणायचे. अश्याच प्रकारे प्रत्येक प्रांतात याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. जसे की दक्षिण भागेत नारळी पूर्णिमा, बलेव आणि अवनी अवित्तम, राजस्थान मध्ये रामराखी आणि चुडाराखी किंवा लूंबा बांधण्याची परंपरा आहे. रामराखी मध्ये लाल दोऱ्यात एक पिवळसर रंगाचे फुंदना(सुताचा बनवलेला गुच्छ किंवा फुल) लावलेला असतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती