मुंबईत संत्र्यांनी भरलेल्या ट्रकमधून 1476 कोटी रुपयांची ड्रग्स जप्त

Webdunia
रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (17:39 IST)
महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) मुंबईने वाशी, नवी मुंबई येथे आयात संत्र्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अडवून 198 किलो उच्च शुद्धता क्रिस्टल मेथॅम्फेटामाइन (बर्फ) आणि 9 किलो उच्च शुद्धता कोकेन जप्त केले आहे. त्यांची किंमत सुमारे 1476 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
या जप्तीनंतर पुढील तपास सुरू असल्याचे डीआरआयच्या मुंबई शाखेकडून सांगण्यात आले. व्हॅलेन्सिया संत्री घेऊन जाणाऱ्या बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज लपवण्यात आले होते. माल आयात करणाऱ्याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.
 
डीआरआयने संबंधित ट्रक पकडल्यानंतर त्या ट्रकमध्ये नेमंक काय आहे याची झडती घेण्यास सुरुवात केली. ट्रकचालक आणि त्याच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीने ट्रकमध्ये संत्री असल्याची माहिती दिली. पण अधिकाऱ्यांना संशय आला नंतर ट्रकची झडती घेतल्यावर त्यांना ड्रग्स आढळली.

Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

पुढील लेख