नवी मुंबई विमानतळाला शरद पवार यांचे नाव देण्याची मागणी

बुधवार, 7 जुलै 2021 (11:25 IST)
नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून वाद सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाने या मागणीसाठी मुंबईत आंदोलन केलं.
 
शरद पवार यांचे राजकीय आणि सामाजिक योगदान मोठं असून ते सलग 54 वर्ष राजकारणात कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे, अशी मागणी प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद हाजी मोमीन यांनी केली आहे.
 
नवी मुंबई विमानतळाला शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचं, तर भाजप आणि नवी मुंबईतील नागरिकांकडून दि.बा.पाटील यांचं नाव देण्याची मागणी होतेय.
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी,नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची भूमिका घेतली आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती