उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद झालीच नाही, मुख्यमंत्र्यांनी दिला परंपरेला छेद

सोमवार, 5 जुलै 2021 (09:28 IST)
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झालीच नाही. प्रत्येक अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून पत्रकार परिषद घेतली जाते पण यावेळी पत्रकार परिषदच झाली नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी परंपरेला छेद दिला असं म्हटलं जात आहे.
 
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम होत असतो, तो कार्यक्रम देखील रद्द करण्यात आला होता.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी कॅबिनेट बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे आणि मित्रपक्षांचे मंत्री या पत्रकार परिषदेत सहभागी होणार होते.
 
या परिषदेत पुढील दोन दिवसांत होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशन आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे त्या पार्श्वभूमीवर ते पत्रकार परिषदेत कोणते मुद्दे मांडतील याकडे सर्वांचं लक्ष होतं.
 
दरम्यान, आज राज्यात MPSC पास झालेल्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येमुळे वातावरण तापलं आहे. या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील बोलले आहेत तेव्हा उद्धव ठाकरे हे यावर काय उत्तर देतील याकडेही लोकांचे लक्ष असेल.
 
तसंच मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण यांसारख्या सध्याच्या ज्वलंत विषयांवर मुख्यमंत्री काय भूमिका घेणार हे पाहणे गरजेचे आहे. आज
 
मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
 
ही बैठक आधी सायंकाळी साडेपाच वाजता होणार होती. पण नंतर तिची वेळ पुढे ढकलून सायंकाळी सहा वाजता होईल, असं कळवण्यात आलं आहे.
 
शक्यतो मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतरच विरोधी पक्षनेत्यांची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार आदी नेते उपस्थित असतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती