ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात एका बंद कारखान्यात 40 -50 वर्षाच्या इसमाचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक आणि कारखान्याचे मालक कारखान्यात पोहोचल्यावर त्यांना जमिनीवर एका व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच निजामपुरा पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
मृतदेहाची ओळख पटवून मृत्यूचे कारण शोधण्यासाठी तपास सुरु करण्यात आला आहे. हा कारखाना बऱ्याच काळापासून बंद होता. ही व्यक्ति कारखान्यात कशी पोहोचली त्याचा तपास सुरु आहे. मृत व्यक्तीची माहिती असल्यास ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून स्थानिक नागरिकांना करण्यात आले आहे.