वसईतील दाम्पत्याचा फिलिपिन्समध्ये रस्ता अपघातात मृत्यू

मंगळवार, 13 मे 2025 (15:58 IST)
पालघर जिल्ह्यातील वसईच्या दाम्पत्याचा फिलिपिन्स मध्ये सुट्टी घालवत असताना रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जेराल्ड परेरा आणि त्यांची पत्नी प्रिया हे 10 मे रोजी फिलिपिन्समध्ये बडियान येथे दुचाकीने प्रवास करत असताना एका ट्रक ने त्यांना धडक दिली ते विजेच्या खांबावर जाऊन आदळले.
ALSO READ: 2 कोटी रुपयांच्या कोडीनसह मेडिकल सेल्स एजंटला ठाण्यातून अटक
या अपघातात प्रिया यांचा जागीच मृत्यू झाला तर जेरॉड हे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले उपचाराधीन  असताना  त्यांचा मृत्यू झाला. 
ALSO READ: परवानगी शिवाय ड्रोन उडवल्याबद्दल मुंबईत एफआयआर दाखल
सदर माहिती वसई येथील सेंट थॉमस चर्चच्या मुख्य पुजाऱ्याने दिली. परेरा दाम्पत्याच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. दाम्पत्याचे मृतदेह भारतात परत आणण्यासाठी कारवाई सुरु असल्याचे चर्चच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे त्यांच्या जवळच्या परिसरात शोककळा पसरली आहे. 
Edited By - Priya Dixit 
 
ALSO READ: लाडकी बहीण योजनेच्या नावाने बँक खाती उघडून सायबर गुंडांना विकली, ३ जणांना अटक

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती