मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा ती तिच्या पतीसोबत वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयातून बाहेर पडत होती, तेव्हा त्याच रुग्णालयात काम करणारे डॉक्टर, ऑफ. डॉ. ए. दासने चालवलेली कार नियंत्रणाबाहेर गेली आणि भरधाव वेगाने महिलेला धडकली. ज्यामुळे आरेकर यांचा जागीच मृत्यू झाला.
तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आणि दासला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. हा अपघात गाडीतील यांत्रिक बिघाडामुळे झाला की मानवी निष्काळजीपणामुळे झाला याची चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.