Mumbai News : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एका जोडप्याचा फिलीपिन्समध्ये सुट्टी घालवताना अपघातात मृत्यू झाला, अशी माहिती चर्च अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. वसई येथील सेंट थॉमस चर्चच्या मुख्य पुजाऱ्याने सांगितले की, हे दांपत्य १० मे रोजी फिलीपिन्समधील बाडियान येथे दुचाकीवरून प्रवास करत असताना एका ट्रकने त्यांना धडक दिली आणि ते विजेच्या खांबावर आदळले. त्यांनी सांगितले की, दाम्पत्य वसईच्या सँडोर भागात राहत होते.