त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माणीतील स्फोटानंतर छत कोसळल्याने 13 ते 14 कामगार अडकल्याची माहिती आहे. त्यातील पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक घटनास्थळी असून सर्व प्रकारची मदत केली जात आहे. एसडीआरएफ आणि नागपूर महानगरपालिकेच्या पथकांनाही बचाव कार्यासाठी पाचारण करण्यात आले असून ते लवकरच पोहोचतील.”
या घटनेची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, “जिल्हा प्रशासन संरक्षण दलांच्या समन्वयाने बचाव कार्यात गुंतले आहे. वैद्यकीय मदतीसाठी पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. आतापर्यंत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या घटनेत एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.”