सूर्य शांती : सूर्य ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी 5 विशेष उपाय

शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019 (13:28 IST)
सूर्य शांतीसाठी
सूर्याच्या शांतीसाठी सकाळी अंघोळ केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पित केलं जातं. नंतर सूर्य संबंधित वस्तूंचे दान, जप, होम मंत्र धारण व सूर्याच्या वस्तूंनी जल स्नान करणे देखील सूर्याच्या उपायांपैकी आहे. सूर्याच्या शांतीसाठी या पाच विधींपैकी एक विधी उपयोगात आणता येऊ शकते. गोचरमध्ये सूर्याचे अनिष्ट प्रभाव दूर करण्यासाठी हे उपाय विशेष रूपात प्रभावी ठरू शकतात.
 
1. स्नान द्वारे उपाय :
गोचरमध्ये सूर्य अनिष्टकारक असल्यास जातकांनी स्नान करताना पाण्यात खसखस किंवा लाल फूल किंवा केशर मिसळून अंघोळ करणे शुभ ठरतं. खसखस, लाल फूल किंवा केशर या सर्व वस्तू सूर्याच्या कारक वस्तू आहे आणि  सूर्याचे उपाय केल्याने अन्य अनिष्टापासून बचावासह जातक आजाराला सामोरा जाण्यास सक्षम होतो.
 
सूर्याचे उपाय केल्याने जातकाच्या वडिलांच्या आरोग्यात सुधार होण्याची शक्यता वाढते. सूर्याच्या वस्तूंनी स्नान केल्यावर सूर्याच्या वस्तूंचे गुण व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात आणि त्याच्या शरीरात सूर्याच्या गुणांमध्ये वृद्धी करतात.
 
2. दान :-
सूर्य वस्तूंनी स्नान करण्याव्यतिरिक्त सूर्य वस्तूंचे दान केल्याने देखील सूर्याच्या अनिष्टापासून वाचता येतं. यात तांबा, गूळ, गहू, मसूर डाळ दान करता येते. हे दान प्रत्येक रविवारी किंवा सूर्य संक्रांतीच्या दिवशी करणे योग्य ठरतं. सूर्य ग्रहणाच्या दिवशी देखील सूर्य वस्तूंचे दान करणे फायदेशीर ठरतं.
 
या उपाय अंतर्गत सर्व वस्तूंचे दान सोबत करता येऊ शकतं. दान करताना वस्तूंचे वजन आपल्या सामर्थ्यानुसार करता येतं. आपल्या संचित धनातून दान करणे अधिक योग्य ठरतं. ज्या जातकानिमित्त दान केलं जातं असेल ती व्यक्ती दान देण्यात सक्षम नसेल अर्थात वयाने लहान असल्यास किंवा इतर काही कारणामुळे त्या व्यक्तीच्या हाताने दान करणे शक्य नसल्यास कुटुंबातील जवळीक व्यक्ती त्या जातकाच्या निमित्ताने दान करू शकतात. दान करताना सूर्य देवावर पर्ण विश्वास आणि श्रद्धा असणे आवश्यक आहे. आस्था नसल्यास कोणत्याही उपायाचे पूर्ण शुभ फल प्राप्त होत नाही.
 
3. मंत्र जाप :-
सूर्य उपायांपैकी मंत्र जाप देखील एक उपाय आहे. सूर्य मंत्रांमध्ये 'ॐ घूणि: सूर्य आदित्य: मंत्र' जप केला जातो. या मंत्राचा जप दररोज करता येतो तसेच प्रत्येक रविवारी जप करणे विशेष शुभ प्रदान करणारे ठरतं. दररोज जप करण्यासाठी मंत्रांची संख्या 10, 20 किंवा 108 असावी. मंत्रांची संख्या वाढवता देखील येऊ शकते तसेच सूर्य संबंधित इतर कार्य जसे हवनात या मंत्राचा जप करणे शुभ ठरतं.
 
मंत्राचा जप करताना व्यक्तीला शुद्धतेचं पूर्ण लक्ष ठेवणे गरजेचं आहे. मंत्र जपताना जातकांनी सूर्य देवाचे ध्यान करत राहावे. मंत्र जपताना एकाग्रता ठेवावी. यात मधून उठणे योग्य नाही.
 
4. सूर्य यंत्र स्थापना :- 
सूर्य यंत्राची स्थापना करण्यासाठी सर्वात आधी तांब्याच्या पत्र किंवा भोजपत्रावर विशेष परिस्थितीत कागदावर सूर्य यंत्र निर्माण केलं जातं. सूर्य यंत्रात समान आकाराचे 9 ब्लॉक तयार केले जातात. यात निर्धारित संख्या लिहिली जाते. वरील 3 खंडात 6, 1, 8 संख्या क्रमश: वेगवेगळ्या खंडात असावी.
मध्य भागात 7, 5, 3 संख्या लिहिल्या जातात आणि शेवटल्या खंडात 2, 9, 4 लिहिलं जातं. या यंत्राच्या संख्यांची विशेषता आहे की यांचा सम कोणत्याही खंडाशी केल्यास बेरीज 15 असेल. संख्या निश्चित वर्गात लिहिलेली असावी.
 
तांब्याच्या पत्रावर कप्पे तयार करून संख्या लिहिणे किंवा भोजपत्रावर किंवा कागदावर लाल चंदन, केशर, कस्तुरी द्वारे खंड तयार करावे. डाळिंबाच्या लेखणीने खंड तयार करणे अधिकच उत्तम ठरेल. सर्व ग्रहांचे यंत्र तयार करण्यासाठी या वस्तूंनी आणि पदार्थांनी लेखन केलं जातं. 
 
5. सूर्य हवन करणे :-
सूर्य मंत्र हवनात प्रयोग करता येईल. हवन करण्यासाठी जाणकार पंडितांचा सल्ला घ्यावा.
 
सूर्य कुंडलीत आरोग्य शक्ती व वडिलांचे कारक ग्रह असतात. जन्म कुंडलीत सूर्याचे दुष्प्रभाव प्राप्त होत असल्यास सूर्य राहू-केतूने पीडित असल्यास सूर्य संबंधित उपाय करणे फायदेशीर ठरतं. विशेष म्हणजे हे उपाय सूर्य गोचरमध्ये शुभ फल देण्यात सक्षम नसल्यास यातून कोणताही उपाय करता येतो.
 
या व्यतिरिक्त सूर्य गोचरमध्ये सहाव्या घराचा स्वामी किंवा सातव्या घराच्या स्वामीवर आपली दृष्टी टाकत त्याला पीडित करत असल्यास या उपायांनी कष्टांपासून मुक्ती मिळते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती