भंडारा येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीत स्फोट, 5 जणांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. स्फोटाची माहिती मिळताच मदत आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आणि कारखान्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. स्फोटानंतर कारखान्यात उपस्थित असलेल्या 5 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. व इतर अनेक कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. हा शक्तिशाली स्फोट ऑर्डनन्स फॅक्टरीच्या शाखा विभागात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
ऑर्डनन्स फॅक्टरीत स्फोट होताच संपूर्ण परिसरात गोंधळ आणि आरडाओरडा झाला. जखमींना मदत करण्यासाठी घटनास्थळी रुग्णवाहिका उपस्थित आहे. जिल्हा दंडाधिकारी संजय कोलते यांनी सांगितले की, सकाळी साडेदहाच्या सुमारास शस्त्रास्त्र परिसरात स्फोट झाला. या प्रकरणात तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.