कुणालने चक्क राज ठाकरे यांना दिली वडापावची ‘लाच’

मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020 (11:31 IST)
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना वडापावद्वारे ‘लाच’ देण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. कुणालने चक्क राज ठाकरे यांना किर्ती कॉलेजच्या वडापावची ‘लाच’ देत आपल्या कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी विनंती केली आहे. ‘Shut Up Ya Kunal’ या आपल्या युट्यूबवरील लोकप्रिय कार्यक्रमासाठी कुणालने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आमंत्रित केले आहे.
 
कुणाल कामराने शिवाजी पार्कजवळ राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानाबाहेर हातात वडापाव घेऊन फोटो काढला आहे.  हा फोटो आणि त्यासोबत राज ठाकरेंसाठी लिहिलेलं एक पत्र स्वतः कुणाल कामराने ट्विट केलं आहे. त्या पत्रात, “मी तुमच्याबाबत केलेल्या अभ्यासामध्ये तुम्हाला किर्ती कॉलेजचा वडापाव खूप आवडतो असं कळलं, त्यामुळे तुम्हाला लाच म्हणून तोच वडापाव आणला आहे. किमान आता तरी तुम्ही माझ्या Shut Up Ya Kunal या कार्यक्रमात येण्यासाठी वेळ द्यावी” अशी विनंती कुणालने राज यांना पत्राद्वारे केली आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती