मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान मोठा अपघात, 5 मुलं समुद्रात बुडाली; तीन अद्याप बेपत्ता

सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (09:56 IST)
मुंबईत शनिवारी गणपती विसर्जनादरम्यान वर्सोवा बीच परिसरात पाच मुलं  समुद्रात बुडाली. या घटनेबाबत मुंबई अग्निशमन दलाने सांगितले की, स्थानिक लोकांनी तातडीने दोन्ही मुलांची सुटका करून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेले, तर तीन मुलांचा शोध अद्याप सुरू आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
 
अग्निशमन दलाने सांगितले की,लाईफ बॉय आणि मनिला रोप,पूर बचाव पथकाद्वारे बचाव कार्य राबविले जात आहे आणि आणखी तीन मुलांना शोधण्यासाठी एलईडी दिवे द्वारे बुडणाऱ्या भागात आणि आसपास फेरी बोटींचा वापर करून तिन्ही मुलांना शोधण्यासाठी पोलिस बोटीचीही मदत घेण्यात आली आहे.बचाव कार्य लक्षात घेऊन जेट्टीच्या फ्लडलाइट्स देखील लावण्यात आल्या आहेत. 
 
मुंबईतील गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी रविवारी दुपारपर्यंत शहरातील विविध ठिकाणी गणपती आणि गौरीच्या तब्बल 2,185 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.स्थानिक संस्थेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कोविड 19 मुळे, गणेश उत्सव सलग दुसऱ्या वर्षी अत्यंत कडक निर्बंधाने साजरा करण्यात आला.
 
सामान्य वर्षांमध्ये, गणेश उत्सवाच्या वेळी, मुंबईतील गणपतीच्या पंडालमध्ये दर्शनासाठी प्रचंड गर्दी, भक्तांच्या लांबच लांब रांगा दिसायच्या, पण गेल्या दोन वर्षांपासून उत्सव थोडे फिकट झाले आहेत.यंदा गणेशोत्सव 10 सप्टेंबरपासून सुरू होऊन 19 सप्टेंबर रोजी त्याची सांगता झाली.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती