रुपलचे घरचे तिला फोन करत होते, मात्र ती फोन उचलत नसल्याने घरच्यांना तिच्या मित्राला याबाबत माहिती दिली. त्यावेळी मित्र तिच्या घरी पोहोचला, तेव्हा दरवाजा ठोकूनही कुणीही दरवाजा उघडला नाही. दरवाजा तोडला त्यावेळी घटनेची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पवई पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी झाले आणि पुढील तपास सुरु केला आहे.