सुधीर मोरे कट्टर ठाकरे समर्थक होते. ते रत्नागिरी जिल्ह्याचे विद्यमान संपर्कप्रमुख होते. ते विक्रोळी पार्कसाईट विभागात वास्तव्याला होते. सुधीर मोरे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप माहित नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांना ब्लॅकमेल केले जात होते आनि याच दबावातून त्यांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलल्याचे निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी रात्री सुधीर मोरे यांना एक फोन आल्यावर ते अंगरक्षकांना सोबत न घेताच घराबाहेर पडले. रिक्षाने घाटकोपरला गेले नंतर सुधीर मोरे ट्रॅकवरुन चालत घाटकोपर आणि विद्याविहार या दोन स्थानकांमध्ये असलेल्या पुलाखाली जाऊन रुळावर झोपले.