मुंबईतील दादरमधील चित्रा सिनेमाच्या कॅन्टीनला रविवारी दुपारी भीषण आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. रविवारी दुपारी 3.15 च्या सुमारास मध्य मुंबईतील दादर भागातील सिंगल स्क्रीन चित्रा सिनेमाच्या कॅन्टीनमध्ये आग लागली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पाण्याचे टँकर तातडीने घटनास्थळी पोहोचले. 10 मिनिटांत आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र कॅन्टीनचा परिसर धुराच्या लोटाने भरून गेला होता. मात्र, सर्वजण सुखरूप पळून जाण्यात यशस्वी झाले.