मुंबईत 4 मजली इमारत कोसळली, 20-25 लोक ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती

Webdunia
मंगळवार, 28 जून 2022 (08:01 IST)
पावसाळा सुरू होताच इमारत कोसळण्य़ाची घटना मुंबईतील कुर्ला येथे घडली आहे. कुर्ल्यातील नाईकनगर परिसरात सोमवारी रात्री ही इमारत कोसळली.
 
अग्निशमन दलाचे जवान ढिगाऱ्याखाली सापडलेल्या लोकांना वाचवण्याचे काम करत आहेत. आतापर्यंत 5 जणांची सुटका करण्यात आली असून आणखी काही लोक अडकल्याची शक्यता आहे.
 
 
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार 20-25 लोक ढिगाऱ्याखाली अडकले असावेत.

संबंधित माहिती

पुढील लेख