पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फसवणूक सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तक्रारदार, माफरीन जमशेद इराणी (38) ही एक व्यावसायिक पार्टी प्लॅनर आहे, ती कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक होती. 17 जानेवारी रोजी, दुपारी 2 च्या सुमारास,तिला तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी मिळाली या मध्ये टिकिट उपलब्धतेची जाहिरात होती.महिलेने या वर मेसेज केला. तिला प्रत्येक तिकीटाची कीमत 12,000 ते 15,000 रुपये सांगण्यात आली.तिने तीन तिकीट घेण्याचे मान्य केले. आणि आरोपीने पाठविलेल्या क्यूआर कोडवर 45 हजार रुपयांचे प्रारंभिक पेमेंट केले.
17 जानेवारी रोजी दुपारी 2 ते 18 जानेवारी रोजी पहाटे 2 च्या दरम्यान, फसवणूक करणाऱ्याने इराणी यांना ₹ 1.60 लाखांचे एकूण पाच व्यवहार करण्यास प्रवृत्त केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच इराणी यांनी ताड़देव पोलिसांशी संपर्क साधून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला असून प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.