Maharashtra Marathi Breaking News Live Today: राज्य सरकारने नाशिक आणि रायगडसाठी पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवर बंदी घातली आहे. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांना यामुळे धक्का बसल्याचे मानले जात आहे. पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर 24 तासांपेक्षा कमी वेळात या दोन्ही जिल्ह्यांमधील नियुक्त्या स्थगित करण्याचा निर्णय सरकारला पेचप्रसंगात टाकणारा आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....