जागतिक महिला दिन विशेष 2021 : "महिलांचा सन्मान "

बुधवार, 3 मार्च 2021 (09:55 IST)
आपल्या भारतीय संस्कृतीत महिलांना विशेष सन्मान आणि महत्त्व दिले आहे. संस्कृतामध्ये एक श्लोक आहे  'यस्य पूज्यंते नार्यस्तु तत्र रमन्ते देवता:' म्हणजे जिथे स्त्रीची पूजा केली जाते तिथे देवता वास्तव्यास असतात. परंतु सध्याच्या आधुनिक काळात सर्वत्र नारींचा अपमानच होत आहे. तिला एक भोगवस्तू म्हणून बघितले जाते तिचा वापर केला जात आहे. स्त्री ही भोगवस्तू नसून तिला देखील काही भावना आहे हे समजत नाही .
आईचा नेहमी आदर केला पाहिजे-
जननी ही या जगावर सर्वात पवित्र रूप आहे. आई ला भगवंतांपेक्षा देखील उंच मानले आहे. कारण जन्मदात्री ही आई म्हणजे बाईचं आहे. जिच्या पोटी कृष्ण,राम, गणपती, ह्यांनी जन्म घेतले आहे. 
सध्याच्या काळात आईला तितकेशे महत्त्व दिले जात नाही.जो बघा तो स्वार्थापोटी तिचे महत्त्व विसरत आहे. नवी पीढीतर आईच्या भावनांना काहीच समजत नाही .पदोपदी तिचा अपमानच करत आहे. सध्याच्या काळात नारीरुपी शक्तीला आईला सन्मान मिळालाच पाहिजे. नव्या पिढीला या विषयी आत्मनिरीक्षण केले पाहिजे. 
 
मुली पुढे वाढत आहे- 
सध्याच्या काळात मुली मुलांपेक्षा अधिक प्रगती करत आहे. प्रत्येक क्षेत्रात मुलांना स्पर्धा देऊन पुढे वाढत आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालणारी स्त्री चे संपूर्ण आयुष्य पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून निघतो. आधीचे जीवन वडिलांच्या घरात घर कामात राबते अभ्यास पण करते हा उपक्रम लग्नापर्यंत चालू  असतो. नंतर लग्न झाल्यावर सासरची जबाबदारी पडते.तिच्या साठी वेळच नसतो घरात संयुक्त परिवार असल्यास तिच्या वर सगळ्या कामाची जबाबदारी पडते. या सगळ्यात तिच्या हौस इच्छा आकांक्षा कुठे दाबल्या जातात हे तिलाच कळत नाही. तरी तिला मान सन्मान नाही. परिवारासाठी केलेला हा त्याग त्यांना सन्मानाचा अधिकारी बनवतो. 
मुलांमध्ये देखील संस्कार घालण्याचे काम देखील आई करते. लहान पणा पासून आपण ऐकत आलो आहोत की आई मुलांची प्रथम गुरु असते. आईच्या नकारात्मक आणि सकारात्मक दोन्हीचे प्रभाव मुलांवर पडतात. 
 
इतिहासात बघावं तर आई पुतळीबाईंनी गांधींजी आणि आई जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले. त्यांना संस्काराची शिदोरी दिली . ह्याचा परिणाम की आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या श्रेष्ठ व्यक्तिमत्त्वामुळे ओळखतो. त्यांचे व्यक्तिमत्त्व विशाल आणि अद्वितीय आहे. चांगल्या संस्काराचे घडण मुलं आई कडूनच शिकतात. चांगले संस्कार देऊन त्याला समाजात चांगलं बनविण्यासाठी महिला आदरणीय आहे.  
 
सध्या व्यभिचार होण्याच्या बातम्या ऐकू येतात महिलेचा विनयभंग केला. असं ऐकण्यात येत आहे.आजकाल दररोज महिलांबरोबर व्यभिचाराच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये वाचत आहोत. हे नैतिक क्षय आहे माणूस कोणत्या पातळीवर खाली गेला आहे दररोज महिलांचा विनय भंग करून त्यांची छेड काढून त्यांच्या विषयी घाणेरडे उद्गार काढून दाखवतात. 
या मागील कारणे काय असू शकतात प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये दिवसेंदिवस वाढणारी अश्लीलता. ज्याचा आजच्या तरुण पिढीवर वाईट परिणाम होत आहे. दिल्ली मधील झालेल्या सामूहिक बलात्काराने जगाला हादरून टाकले होते. स्त्रीच्या सन्मानाचे रक्षण करण्यावर काही तरी केले पाहिजे आणि याचा विचार करायला पाहिजे. 
काही लोक म्हणतात की या सर्व गोष्टीनां कारणीभूत स्त्रियांचे आधुनिक पोशाख आहे या मुळे असे गुन्हे वाढत आहे. कपड्यांमुळे गुन्हेगारी होते असे म्हणू शकत नाही. आजच्या काळात लहान मुलींवर देखील लैंगिक अत्याचार केले जाते. 
इतिहासात बघावं तर देवी अहिल्याबाई होळकर, मदर टेरेसा, इला भट्ट, महादेवी वर्मा, राजकुमारी अमृत कौर, अरुणा आसफअली, सुचेता कृपलानी आणि कस्तूरबा गांधी इत्यादी काही प्रसिद्ध महिलांनी जगभर आपले नाव आणि प्रसिद्धी मिळविली आहे. तर कस्तुरबा गांधी यांनी गांधीजींच्या खांद्याला खांदा लावून देशाला स्वतंत्र करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
प्रियदर्शिनी इंदिरागांधी यांनी आपल्या दृढनिश्चयाच्या बळावर भारत आणि जागतिक राजकारणावर आपला प्रभाव पाडला आहे. त्यांना लोह महिला असेच म्हणत नाही  त्यांनी पती,पिता आणि  मुलाच्या निधनानंतर देखील खचून न जाता धैर्य न गमावता खडकासारखी कामाच्या क्षेत्रात काम करत होत्या. अमेरिकेचे माजी अध्यक्ष रोनाल्ड रेगन त्यांना चतुर महिला म्हणून संबोधित करायचे कारण त्या राजकारणात आणि भाषणात देखील पटाईत होत्या.  
शेवटी हेच सांगत आहोत की आपल्याला प्रत्येक स्त्रीचा सन्मान केलाच पाहिजे.त्यांना दुर्लक्षित करणे त्यांची हत्या करणे आणि स्त्रियांचे महत्त्व न समजून घेतल्यामुळे स्त्रियांची संख्या पुरुषांच्या अर्ध्यावर देखील नाही. माणसाने हे विसरू नये की त्याला जन्म देणारी , त्याला या जगात आणणारी देखील एक बाईचं आहे एक स्त्रीच आहे. भारतीय संस्कृतीत तर आपण देवीची पूजा करतो तिला लक्ष्मी, पार्वती, दुर्गा म्हणून मान देतो आणि घराच्या गृहलक्ष्मीला आदर मान देखील  देत नाही. असं करू नये. स्त्रियांचा नेहमी आदर मान सन्मान करावा. स्त्री आहे तर सर्व जग आहे.अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती