निर्भया... अजून एक तारीख....

वर्षामागून वर्षे गेली, 
दुनिया चालतच राहिली
ॠतुही बदलत राहीले
थांबले नाहीच काही !
 
अधिकाधिक श्वासांची 
त्यांना मिळाली खैरात,
मस्त जगताहेत आपले आयुष्य ते
बिनधास्त, दुखः,वेदनारहित!
 
ज्या चौघांनी माझं आयुष्य 
क्षणात उद्ध्वस्त केलं,
नरक यातना भोगण्यासाठी 
मला रस्त्यावर फेकून दिलं....
 
एकदाच बघा माझ्या 
मातापित्याच्या हताश नजरेत 
एकदाच डोकवा 
छिन्नविछिन्न झालेल्या 
त्यांच्या हृदयात ....
एकदाच आठवा 
माझी तडफड, माझ्या यातना
आणि बंद करा हा तमाशा
तारखेवर पडलेली तारीख.....
अजून एक तारीख....
अजून एक तारीख.....
 
अनुवाद- आरती कुलकर्णी
मूळ कविता- ऋचा दीपक कर्पे

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती