स्त्री निर्माण करू शकते सकारात्मक वातावरण

सोमवार, 7 मार्च 2022 (08:35 IST)
स्त्रिया काहीही करण्याची ताकद ठेवतात. घर असो वा ऑफिस, राजकारण असो वा समाज, हा काळ असा आहे जेव्हा स्त्रीने सगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. कोणतेही क्षेत्र असो स्त्रियांचा सहभाग त्यात सतत वाढत आहे. 
 
स्त्रियांची भूमिका जातीयवाद आणि अराजकतेच्या वातावरणात पण महत्त्वाची असू शकते. स्त्रिया आपल्या सकारात्मक विचारांमुळे काहीही करण्याची ताकद ठेवतात. त्यांच्या सकारात्मक विचारांचा प्रभाव त्यांचा घरांवर तसेच त्यांचा सभोवतीला लोकांवर देखील पडतो. त्यात मग त्यांचा पती असो, मुलं असो किंवा घरातील अन्य सदस्य. कुठल्याही पुरुषाच्या यश संपादनामागे एका स्त्रीचा सहभाग असतो असे म्हटले जाते. खरे आहे हे की पुरुषाची प्रगती स्त्रीमुळे होते. ती मग त्याची आई असो, ताई असो, बायको असो किंवा मैत्रीण. ती त्याला सतत पुढे वाढण्यासाठी प्रेरित करत असते. ते फक्त विचारांच्या देवाण-घेवाण मुळे. 
 
कुठल्याही पुरुष किंवा मुलांमध्ये सकारात्मक विचारांच्या देवाण-घेवाणाची सुरुवात त्याचा घरांपासूनच होते. मुलांवर प्रथम संस्कार त्याची आई देते. मुलं घरात किंवा कौटुंबिक वातावरण शिकत असतो. त्याच्यावर कुटुंबातील सदस्यांचे विचारांचा चांगला किंवा वाईट प्रभाव पडत असतो. समज आल्यावर तो पण त्या चांगल्या विचारांमध्ये सामील होतो. पुरुषांच्या मानसिकतेवर, विचारसरणीवर, घरातील स्त्रियांचा विशेष प्रभाव पडत असतो. तसेच त्यांचा विचारांचा ही प्रभाव स्त्रियांवर पडू शकतो. 
 
स्त्री फारच संवेदनशील आणि हृदयाने अत्यंत कोमल असते. शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या ती कोमलांगी, मृदुल, संवेदनशील असते. 
 
समाजात अराजकतेच्या परिस्थितीत स्त्रियांनी त्यांची संवेदनात्मक पातळी विसरू नये. कारण त्या काही-काही विषयांवर अत्यंत संवेदनशील असतात. 
तरी, शाहीनबाग या स्थितीत अपवाद आहे. इथे स्त्रीचे काही वेगळेच रूप दिसले आहे. मान्य आहे की आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी निषेध म्हणून त्या प्रदर्शनात सामील होत्या पण त्यांचा सोबत त्यांचा निरपराध मुलांना या चळवळीत सामील करून त्या स्त्रीची वेगळीच प्रतिमा तयार केली गेली आहे. 
 
प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ते नाकारणे अशक्य आहे. स्त्रियांना हवे की त्यांनी पण सामाजिक जागृतीच्या संदर्भात महत्त्वाचे आहे की घरात बाहेर, समाजात, कार्यक्षेत्रात त्यांनी स्वतःची शक्ती आणि सामर्थ्या ओळखणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी स्वतःचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवायला हवा आणि आपली विचारसरणी सकारात्मक ठेवायला हवी.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती