आज समाजात पुरुषांच्या योगदाना प्रमाणे स्त्रीचे देखील योगदान आहे. परंतु स्त्रियांना पुरुषांसम अधिकार नाही. म्हणूनच महिलांना आदर देण्यासाठी 8 मार्च रोजी महिला दिवस साजरा केला जातो. या दिवशी महिलेच्या प्रति आपले आदर, प्रेम दर्शवतात. आपण हा दिन त्यांच्या साठी खास करू शकतो. त्यासाठी आपण त्यांना या पैकी काही गिफ्ट देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊ या.कोणते गिफ्ट देऊ शकता.
* ड्रेस किंवा मेकअप किट -
या दिनी आपण आई,बहीण, मैत्रिणी किंवा जोडीदाराला एक चांगला ड्रेस,साडी किंवा मेकअप किट देखील देऊ शकता. हे मिळाल्यावर त्या आनंदी होतील.
* दागिने-
स्त्रियांना दागिन्यांची खूप आवड असते अशा परिस्थितीत आपण त्यांना आवडीचे दागिने भेट वस्तू म्हणून देऊ शकता. इअर रिंग,ब्रेसलेट हार, काहीही भेट म्हणून देऊ शकता.