महिलांना या अधिकारांची माहिती असावी आयुष्यात कामी येतील

बुधवार, 3 मार्च 2021 (20:40 IST)
स्त्रियांचे आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे. अनेक क्षेत्रात स्त्रियां पुरुषांपेक्षा चांगले काम करत आहे आणि नाव वाढवत आहे. महिलांना आज पुरुषांसम मान मिळत आहे.तरी ही काही ठिकाणी महिलांना चांगली वागणूक दिली जात नाही.त्यांना योग्य अधिकार आणि मान दिला जात नाही. महिलांचा देखील या समाजात समान वागणुकीचा अधिकार आहे.  या साठी महिलांना त्यांच्या अधिकारांची माहिती असायला पाहिजे, समाजात त्यांचा काय अधिकार आहे, घरात काय अधिकार आहे, कार्यालयात काय अधिकार आहे. त्यांना कोणता अधिकार कुठे उपयुक्त ठरू शकतो. हे सर्व माहिती असणे आवश्यक आहे. दरवर्षी आपण 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतो, जेणे करून या निमित्ते त्यांचा  सन्मान होऊ शकेल. पण खरचं आपण त्यांना योग्य मान आणि अधिकार देतो का. चला तर मग जाणून घेऊ या की महिलांना कोणते अधिकार  आहेत. 
 
1 शून्य एफआयआर -
जर एखादी महिला बलात्काराला बळी झाली असेल, तर ती आपली तक्रार भारतातील कोणत्याही पोलीस स्टेशनात किंवा ठाण्यात नोंदवू शकते आणि कोणतेही पोलिस स्टेशन पीडित महिलेचा एफआयआर लिहिण्यास नकार देऊ शकत नाही असे सांगून की हा परिसर त्यांच्या कार्यक्षेत्रात येत नाही, कारण महिलांना देण्यात आले आहे झिरो किंवा शून्य एफआयआर चे अधिकार, या अंतर्गत कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा अधिकार या व्यतिरिक्त, महिला नोंदणीकृत पोस्ट किंवा ईमेल द्वारे देखील तक्रार पोलीस ठाण्यात पाठवू शकतात. 
 
2 परवानगी शिवाय कोणीही फोटो/व्हिडीओ सामायिक करू शकत नाही.
एका महिलेचा हक्क किंवा अधिकार आहे की कोणीही तिच्या परवानगी शिवाय इंटरनेट/सोशल मीडियावर तिची चित्रे किंवा व्हिडीओ अपलोड करू शकत नाही.असं केल्यास आपण साईटवर किंवा ज्याने आपले फोटो थेट अपलोड केले आहेत त्या व्यक्तीशी संपर्क साधू शकता.या वेबसाईट्स कायद्याच्या अधीन आहेत आणि त्यांचे पालन करण्यात देखील बाध्य आहेत.माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक क्षणांचे छायाचित्रे त्यांच्या परवानगी शिवाय काढणे प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे प्रतिबंधित आहे. फौजदारी कायद्याच्या अधिनियमांतर्गत परवानगी शिवाय महिलेचे खासगी फोटो काढणे किंवा सामायिक करणे गुन्हा मानले जाते.
 
3 समान वेतन -
आजच्या आधुनिक काळात पुरुषांप्रमाणे स्त्रिया देखील कामावर जातात. महिला शिक्षित झाल्यामुळे स्वतःसाठी काम शोधत आहे. अशा परिस्थितीत जर आपण काम करत असाल तर समान वेतन मिळविण्याचा अधिकार आहे.समान मोबदला कायद्यांतर्गत पुरुष आणि स्त्रियांना समान कामासाठी समान मोबदला देण्याची तरतूद आहे. 
 
4 रात्री पोलीस अटक करू शकत नाही -
एखादी महिला गुन्हेगार असेल किंवा तिच्या वर काही आरोप असेल तर,सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सूर्य मावळल्यानंतर, कोणत्याही महिलेला अटक करता येणार नाही.एक महिला शिपाईसुद्धा तिला रात्री अटक करू शकत नाही.जर गुन्हा फार गंभीर असेल तर या परिस्थितीत पोलिसांना त्या महिलेला रात्री अटक करणे का आवश्यक आहे याची लेखी माहिती दंडाधिकाऱ्यांना द्यावी लागेल. 
 
5 घटना नोंदविण्यास असमर्थ असल्यास नंतर तक्रार नोंदवू शकता-
जर एखाद्या घटनेच्या वेळी एखाद्या महिलेने कोणतीही घटना (बलात्कार/हिंसा)नोंदविण्यास असमर्थता दाखविली, तर तिला बराच काळानंतर देखील तक्रार नोंदविण्याचा अधिकार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती