शनी देवाला अर्पित करा उडीद डाळ खिचडीचा प्रसाद, जाणून घ्या सोपी कृती

गुरूवार, 10 जून 2021 (10:28 IST)
शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आवडीच्या पदार्थांचे नैवेद्य दाखवावे. याने दंड आर्शीवादात बदलतं आणि घर धन-धान्याने भरतं. शनीदेवाला काळे तीळ, काळी उडीद, काळे चणे, गोड पुरी, आणि काळ्या उडीद डाळीने तया खिचडी अत्यंत प्रिय आहे. तर चला जाणून घ्या खिचडी तयार करण्याची सोपी विधी-
 
सामुग्री: अर्धा कप उडीद डाळ, 2 कप तांदूळ, अर्धा चमचा जीरं, अर्धा लहान चमचा हिंग, मीठ आणि तिखट चवीप्रमाणे, 4 चमचे शुद्ध तुप
कृती: कुकरला गरम करुन त्यात तुप घाला. तुप गरम झाल्यावर जिरं, हिंगाची फोडणी घाला. त्यात डाळ-तांदूळ, तिखट, मीठ आणि चाल ग्लास पाणी घालून मध्यम आचेवर ठेवा. दोन किंवा तीन शिट्ट्या येऊ द्या.
 
टीप: खिचडीत पाण्याचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त करु शकता. पुलाव सारखी खिचडी हवी असल्यास पाणी कमी घालावे आणि पातळं खिचडी आवडत असल्यास पाण्याचे प्रमाण वाढवावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती