साहित्य-
400 ग्रॅम गव्हाचं पीठ, 2 चमचे चिली फ्लॅक्स, किंवा तिखट, 1/2 चमचा मीठ,
स्टफिंग साठी -
1 लहान चमचा साजूक तूप,1 लहान चमचा जिरे,1 कप हिरवे मटार, 1 मोठा चमचा तळण्यासाठी तेल.
कृती-
गव्हाच्या पिठात चिली फ्लॅक्स आणि मीठ घाला पाण्याने पीठ मळून घ्या. एका पॅन मध्ये थोडं साजूक तूप गरम करून जिरे घाला. या मध्ये मटार, मीठ आणि तिखट घाला मटार शिजल्यावर दरीदरीत वाटून घ्या. भिजवलेल्या कणकेची वाटी बनवा या मध्ये हे सारण भरून बंद करा. हे लाटून घ्या आणि लाटलेला पराठा कढईत घालून थोडं तेल सोडून दोन्ही बाजूने शेकून घ्या. गरम पराठे दह्यासह सर्व्ह करा.