श्राद्ध पक्षात नैवेद्यात बनवा काकडीचे रायते

Webdunia
शनिवार, 13 सप्टेंबर 2025 (08:00 IST)
साहित्य-
दोन- मध्यम आकाराच्या काकडी
एक कप- दही
एक- हिरवी मिरची  
एक चमचा कोथिंबीर  
अर्धा चमचा- साखर  
मीठ  
अर्धा चमचा- तेल
१/४ चमचा- मोहरी
अर्धा चमचा- जीरे
चिमुटभर हिंग
कढीपत्त्याची पाने
ALSO READ: श्राद्ध पक्षात बनवली जाणारी भोपळ्याची भाजी
कृती-
सर्वात आधी काकडी स्वच्छ धुवून त्याचे साल काढून किसून घ्या किंवा बारीक चिरून घ्या. त्यानंतर त्याला मीठ लावून काही मिनिटे ठेवा. नंतर पाणी काढून घ्या. एका बाउलमध्ये फेटलेले दही घ्या, त्यात काकडी, हिरवी मिरची, कोथिंबीर, साखर आणि मीठ मिक्स करा. आता एका छोट्या तव्यावर तेल गरम करा. त्यात मोहरी आणि जीरे टाका, ते तडतडू लागल्यानंतर हिंग आणि कढीपत्ता घाला. हे दही आणि काकडीच्या मिश्रणावर घाला. आणि चांगले मिक्स करून घ्या.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: श्राद्ध पक्षात बनवले जाणारे भरड्याचे वडे, जाणून घ्या रेसिपी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: पितृपक्षात पितरांच्या नैवेद्यासाठी केल्या जाणार्‍या भाज्या

संबंधित माहिती

पुढील लेख