श्राद्ध पक्षात बनवली जाणारी भोपळ्याची भाजी

गुरूवार, 11 सप्टेंबर 2025 (08:00 IST)
लाल भोपळा म्हणजेच कोणी याला काशीफळ किंवा गंगाफळ देखील म्हणतात. याची भाजी ही सात्विक  पद्धतीने बनवली जाते, कारण श्राद्ध पक्ष काळात तिखट किंवा मसालेदार पदार्थ टाळले जातात.  

साहित्य-
लाल भोपळा- ५०० ग्रॅम  
साखर दोन- चमचे  
मीठ-चवीनुसार
तूप अर्धा- चमचा
जिरे-एक चमचा
हिंग
हिरवी मिरची
कढीपत्ता
खवलेले ओले खोबरे- दोन चमचे
कोथिंबीर
ALSO READ: श्राद्धपक्षातील आमसुलाची चटणी रेसिपी
कृती-
सर्वात आधी भोपळ्याची साल काढून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करा. आता तुकडे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. एका कढईत किंवा प्रेशर कुकरमध्ये १-२ चमचे तूप गरम करा. तुपात जिरे आणि हिंग आणि मिरची तुकडे घालून फोडणी करा. फोडणीत भोपळ्याचे तुकडे घाला आणि मंद आचेवरपरतून घ्या. त्यात अर्धा कप पाणी, मीठ आणि साखर घाला. साखर भोपळ्याच्या नैसर्गिक गोडव्यासाठी थोडी जास्त घालू शकता. प्रेशर कुकर वापरत असाल तर १ शिट्टी काढा किंवा कढईत झाकण ठेवून भोपळा नरम होईपर्यंत शिजवा. भोपळा पूर्ण शिजला पाहिजे पण फार मऊ होऊन पाणी सोडू नये. शिजलेल्या भाजीवर खोबरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: श्राद्ध पक्षात बनवा तांदळाची खीर रेसिपी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: श्राद्धपक्षातील आमसुलाची चटणी रेसिपी

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती