कृती -
सर्वात आधी एका पॅनमध्ये तेल गरम करा. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतवून घ्या. यानंतर त्यात आले-लसूण पेस्ट घालावी. आता चिरलेला टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून परतवून घ्यावे. तसेच हळद, तिखट आणि धणेपूड घालावी. यानंतर, हे सर्व चांगले मिक्स करून त्यात चिरलेले मशरूम आणि मटार घालावे. नंतर गरजेनुसार पाणी घालून मिक्स करावे. व मीठ घालून शिजू द्यावे. आता पॅन वर झाकण ठेवावे. मटार मऊ होईपर्यंत शिजवा. नंतर त्यात गरम मसाला घालावा. तर चला तयार आहे आपले चविष्ट मटार मशरूम रेसिपी, पोळी सोबतच नक्कीच सर्व्ह करा.