Lohri special recipe : डिनर मध्ये बनवा मेथी छोले रेसिपी
सोमवार, 13 जानेवारी 2025 (14:56 IST)
साहित्य-
एक कप छोले भिजवलेले
दोन कप ताजी मेथी
दोन टोमॅटो
एक कांदा
एक टीस्पून आले-लसूण पेस्ट
अर्धा टीस्पून हळद
एक टीस्पून धणेपूड
अर्धा टीस्पून जिरे पावडर
अर्धा टीस्पून गरम मसाला
चवीनुसार मीठ
दोन चमचे तेल
एक चमचा जिरे
एक चिमूटभर हिंग
कोथिंबीर
एक चमचा लिंबाचा रस
कृती-
सर्वात आधी भिजवलेले छोले स्वच्छ धुवून घ्यावे. आता प्रेशर कुकरमध्ये घालून थोड्या प्रमाणात पाणी घालून शिट्टी घेऊन घ्यावी. आता एका कढईत तेल गरम करून त्यात हिंग, जिरे आणि नंतर कांदा घालून परतून घ्यावे. तसेच आले-लसूण पेस्ट घालून परतून घालावी नंतर टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा. आता त्यात मसाले घालावे आणि मंद आचेवर शिजू द्यावे. तयार मसाल्यात बारीक चिरलेली मेथीची पाने घालावी. मेथी शिजली की त्यात छोले घालावे. तसेच त्यात लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालावी. तर चला तयार आहे आपली लोहारी सण विशेष मेथी छोले रेसिपी, गरम नक्कीच सर्व्ह करा. अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.