भोगी विशेष खिचडी बनवण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये तूप घालावे व तूप गरम झाल्यानंतर नंतर त्यात जिरे, हिंग, दालचिनी, तमालपत्र, काळी मिरी आणि घालून चांगले परतून घ्यावे. आता टोमॅटो, हळद, मिरची तुकडे, आले आणि मटार घालून परतवून घ्यावे. आता यामध्ये मुगाची डाळ, तांदूळ, तिखट आणि मीठ घालावे.आता पाणी घालून आणि झाकण बंद करावे. यानंतर कुकरची एक शिट्टी येईपर्यंत मोठ्या आचेवर शिजवा. नंतर मध्यम आचेवर 1 शिट्टी वाजल्यानंतर गॅस बंद करावा. कुकर थंड झाल्यानंतर खिचडी प्लेट मध्ये काढून त्यावर तूप घालावे व कोथिंबीर गार्निश करावी. तसेच तुम्हाला आवडत असल्यास खोबरे किस देखील गार्निश करू शकतात. तर चला तयार आहे आपली भोगी विशेष चविस्ट खिचडी रेसिपी, गरम नक्कीच सर्व्ह करा.